
चित्रकर्मी क्रिकेट लिग
89087
-
लोगो- चित्रकर्मी क्रिकेट लीग
-
सोलर बेबी लाईट संघाला विजेतेपद
रॉयल कोरिओग्राफर्स संघ उपविजेता, ज्येष्ठ रंगकर्मींचे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः नेहमी चित्रपट, मालिका, लघुपट, वेबसीरिज आणि जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यक्त असणाऱ्या कलाकार-तंत्रज्ञांनी क्रिकेटच्या मैदानावरही चौकार-षटकारांची आतषबाजी केली. निमित्त होते, चित्रकर्मी क्रिकेट लीगचे. स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले. सोलर बेबी लाईट संघाने विजेतेपद तर रॉयल कोरिओग्राफर्स संघाला उपविजेतेपद मिळाले. मास्टर ऑफ आर्ट संघाने तिसरा क्रमांक पटकावला.
डायरेक्टर स्वॅग, डीओपी वॉरियर्स, मास्टर ऑफ आर्ट, अव्हेंजर, विंग ऑफ डिझायर, झुंजार ११ प्रॉडक्शन, रॉयल कोरिओग्राफर्स, सोलर बेबी लाईट अशा आठ संघांत ही स्पर्धा रंगली. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला.
ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या स्मरणार्थ पहिल्या क्रमांकाचे तर राजारामबापू जाधव यांच्या स्मरणार्थ दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
सचिन सावंत मालिकावीर तर उत्कृष्ट गोलंदाज विकी बिडकर, उत्कृष्ट फलंदाज म्हणून शुभम जठार यांना गौरवण्यात आले. संग्राम भालकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा झाली.
अमर मोरे, जयदीप निगवेकर, विकी बिडकर, सैफ बारगीर, रणजित जाधव, अजय खाडे, चिंटू स्वामी यांनी संयोजन केले. रजत शर्मा यांनी पंच म्हणून काम पाहिले. कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे संचालक कृष्णात धोत्रे, ज्येष्ठ अभिनेत्री विना भूतकर, सपना जाधव-भालकर, रवी गावडे, दीपक महामुनी, सर्जेराव पाटील, उमेश बोळके, मंजू खेत्री, प्रीती क्षीरसागर, अमोल नाईक आदी उपस्थित होते.