Thur, June 1, 2023

कर्मचारी संप
कर्मचारी संप
Published on : 14 March 2023, 2:20 am
संपामुळे सरकारी कार्यालये ठप्प
शंभर टक्के प्रतिसाद : नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : सरकारने दिलेला शिस्तभंगाच्या कारवाईचा आदेश डावलून शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षककेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला आज शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालये ओस पडली. याचा लोकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. तर, आज संप असल्याने अनेकांनी सरकारी कार्यालयांकडे पाठ फिरवली. जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी काल मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील ८० हजार शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षककेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला आहे.