कर्मचारी संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी संप
कर्मचारी संप

कर्मचारी संप

sakal_logo
By

संपामुळे सरकारी कार्यालये ठप्प

शंभर टक्के प्रतिसाद : नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १४ : सरकारने दिलेला शिस्तभंगाच्या कारवाईचा आदेश डावलून शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षककेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला आज शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालये ओस पडली. याचा लोकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. तर, आज संप असल्याने अनेकांनी सरकारी कार्यालयांकडे पाठ फिरवली. जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी काल मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील ८० हजार शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षककेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला आहे.