
जागृत देवस्थान खणदाळची श्री महालक्ष्मी
डोके ः श्री महालक्ष्मी यात्रा, खणदाळ विशेष
-----------------------------------
gad148.jpg :
89051
खणदाळची श्री महालक्ष्मी देवी
--------------------------------------------
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसलेले व हिरण्यकेशी नदी काठावरील खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा पाच वर्षांनंतर यंदा होत आहे. आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या या यात्रेनिमित्त...
- विठ्ठल चौगुले, नूल
----------------------------------------
जागृत देवस्थान
खणदाळची श्री महालक्ष्मी
महालक्ष्मी देवीची यात्रा दर पाच वर्षांनी होते. १९६३ पासून २०२३ पर्यंत यात कधीही खंड पडला नाही. सुरुवातीच्या काळात कै. रामगोंडा मलगोंडा पाटील, कै. पुनाप्पा काडाप्पा मगदूम, कै. दुंडाप्पा बाळाप्पा मगदूम, कै. इराप्पा चन्नाप्पा गोटूरी, कै. रुद्राप्पा भरमा मगदूम, कै. शंकर हसूरी, कै. दुंडाप्पा सत्याप्पा कोणुरी, कै. बाबू कृष्णा चिरमुरे, कै. रावसाहेब मलगोंडा पाटील यांनी पुढाकार घेऊन महालक्ष्मीच्या यात्रेला सुरुवात केली. १९८८ पासून माजी सरपंच शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली यात्रा होत आहे. श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ही आठवी यात्रा होत आहे.
गावापासून दीड किलोमीटरवर असलेल्या मंदिराची तेराव्या शतकात राजा भोज यांच्या काळात स्थापना झाल्याचे जाणकार सांगतात. २५ वर्षांपूर्वी शशीकांत पाटील यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. आतापर्यंत ५० लाखांहून अधिक खर्च विकासकामांवर झाला आहे. भविष्यात भाविकांच्या सोयीसाठी निवासस्थान बांधण्याचा मानस आहे. मंदिरासाठी ग्रामस्थांनी श्रमदान केले होते. दहा भुजांच्या महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. खणदाळसह पंचक्रोशीतील भाविकांची यात्रेला गर्दी असते. यात्रा समितीचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील समितीतील सुमारे ५० सदस्यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळे, ग्रामस्थ यात्रा शांततेत होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, गावाने शैक्षणिक क्षेत्रातही भरारी घेतली असून गावातील अनूप शशिकांत पाटील हे उपजिल्हाधिकारी पदावर सध्या लातूर येथे कार्यरत आहेत.