जाणता लोकनेता ‘प्रकाश आवाडे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाणता लोकनेता ‘प्रकाश आवाडे’
जाणता लोकनेता ‘प्रकाश आवाडे’

जाणता लोकनेता ‘प्रकाश आवाडे’

sakal_logo
By

89102

* आमदार प्रकाश आवाडे वाढदिवस विशेष ----- 8 कॉलम रिव्हर्स पट्टी
---------------------------------------------------------

पुरवणी संकलन ः संदीप जगताप (इचलकरंजी), बाळासाहेब कांबळे (हुपरी), राजू मुजावर (कुंभोज), प्रा. रवींद्र पाटील (कबनूर)
----------------
जाणता लोकनेता ‘प्रकाश आवाडे’

जमलेल्या गर्दीचा नेतेगिरीसाठी उपयोग करून घेऊन आपली उंची वाढवणारे नेते आजकाल सर्वत्र दिसतात; पण अशा सवंग पुढारीपणाचा बुडबुडा फार काळ टिकत नसतो. लोक समुदायांच्या वेगवेगळ्या समस्यांच्या लाटेत अशा कथित नेत्यांचे पितळ उघडे पडते. अर्थात विकास कार्याची जाण, दूरदृष्टी आणि दीर्घकालीन लोकनेतृत्‍वासाठी अहोरात्र वेचावे लागणारे कष्ट करून विधायक कार्यातून आपले नेतृत्व सिद्ध करणारे प्रकाश आवाडे यांच्यासारखे नेतृत्व हे पश्‍चिम महाराष्ट्राला लाभलेले एक वरदान म्हणावे लागेल.
-प्रतिनिधी
-----------------------------
कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासारख्या सहकाराचा डोंगर उभारून विधायक कार्याला वाहून घेणाऱ्‍या पित्याच्या सहवासात प्रकाश आवाडे यांना लोकसेवेचे बाळकडू मिळाले. कै. दत्ताजीराव कदम, कै. बाबासाहेब खंजिरे, कै. अनंतराव भिडे या दिग्गज नेत्यांची निरपेक्ष कार्यपद्धती प्रकाश आवाडे यांनी जवळून पाहिली. पक्ष संघटनेसाठी समर्पितपणे कार्य करणारे पु. बा. सुभेदारकाका व मल्हारपंत बावचकर यांच्यासारख्या प्रभूतींमुळे त्यांच्यामध्ये एक सालस व शिस्तबद्ध कार्यकर्ता घडत गेला.
इचलकरंजीतील राजकीय चळवळीला केवळ पक्षीय अभिनिवेश नव्हता तर सहकाराच्या स्पर्शाने ती चळवळ विधायक अंगाने बहरत होती. म्हणूनच व्यक्तीपेक्षा संघटनेला अधिक महत्त्‍व देणारे आणि संघटनेपेक्षाही लोककल्याणाला वाहून घेणारे कार्यकर्ते येथील राजकीय पटलावर तयार होत गेले. अशा सार्वजनिक कार्यकर्त्यांच्या मजबूत मुशीत तयार झालेले प्रकाशआण्णा लोकसेवेला प्रमाण मानून राजकारण करताना दिसतात.
अचानकपणे आणि अगदी अनपेक्षितपणे लाभलेल्या आमदारकीचा त्यांनी आपल्या आगळ्या कार्यशैलीतून आदर्श वस्तुपाठ निर्माण केला. स्वत:च्या पक्षाचे सरकार सत्तेत असताना येथील यंत्रमाग व्यवसायाची दुरवस्था पाहून आंदोलन करताना पक्षशिस्तीची पर्वा त्यांनी केली नाही. अन्यायाला वाचा फोडताना सत्याची बाजू घेऊन रस्त्यावर उतरलेल्या आणि प्राणाची पर्वा न करता आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बेमुदत उपोषणाला बसलेल्या प्रकाशआण्णांची ती धडाडी इचलकरंजीच्या नागरिकांनी विसरलेली नाही. तरुण मित्रांना घेऊन पदयात्रेतून विधानसभा मतदारसंघातील गावांना भेटीतून वास्तवाचा अभ्यास करणारे प्रकाशआण्णा आपल्या कृतीतून लोकांच्या गळ्यातील ताईत बनले.
अल्पावधीत मिळालेल्या मंत्रिपदाचा परिसर विकासासाठी केलेला उपयोग आणि इचलकरंजीच्या पाणीपुरवठा योजनांपासून वाड्या-वस्त्यातील रस्त्यांपर्यंत त्यांच्या विकासाचा आलेख शब्दात पकडणे कठीण आहे. रखडलेल्या कृष्णा पाणी योजनेला गती देत असतानाच गैबी बोगद्यातून इचलकरंजीसाठी पाण्याची तरतूद करून पंचगंगा प्रवाहित ठेवण्याचा प्रकाश आवाडे यांचे द्रष्टेपण तोंडाला येईल ते बोलणाऱ्‍यांनी अभ्यासून पहावे. चार-चार वेळा लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळण्यामागे प्रकाश आवाडे यांचे हे विकासासाठीचे झपाटलेपण होते.
इचलकरंजीच्या न्यायालयाच्या वास्तुपासून क्लस्टर योजनेतून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यांपर्यंत सामावलेले कार्य सामान्यांच्या कल्पनेपलीकडील आहे. सीईटीपीपासून महिला गारमेंट प्रशिक्षणापर्यंत त्यांनी राबवलेल्या अभिनव योजनांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातून जिज्ञासूंची रिघ लागली होती. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडवतानाच ‘जवाहर’ची उभारणी ते ‘डीकेटीई’ सारख्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेची निर्मिती यामागे प्रकाश आवाडे यांचा कर्तृत्वशाली हात आहे, हे सर्वश्रुत आहे.
देशातील आणि राज्यातील राजकीय क्षितिजावर उलाथापालथ होत असताना या नेत्यास म्हणावे तसे पाठबळ संघटनेकडून मिळत नव्हते. जातीयवादी शक्ती अधूनमधून तोंड काढत होत्या. प्रकाश आवाडे यांना अशा एका गाफिल प्रसंगी पराभवाला सामोरे जायला लागले. दरम्यान, प्रकाश आवाडे यांचे राजकारणात पुनरागमन होईल की नाही इतपत अफवा विरोधकांकडून पसरवल्या जात असतानाच पक्षाची वस्त्रप्रावरणे बाजूला सारून हा नेता महापुराने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मदतीसाठी जीवाचे रान करीत होता. पक्षापेक्षा सेवा आणि प्रसिद्धीऐवजी लोककल्याणचा वसा या ध्येयाने प्रेरित झालेल्या प्रकाश आवाडे कार्य पुनश्‍च रुजले. म्हणूनच गेल्या निवडणुकीत त्यांना पुन्हा आमदारकीचा बहुमान जनतेने मिळवून दिला.
ताराराणी पक्षाच्या माध्यमातून विधायक विचार आणि विकासाचा निर्धार घेऊन लोककल्याणासाठी झटणारे प्रकाश आवाडे हेच मुळी एक राजकीय पक्ष आहेत. ते कुठेही असोत त्यांच्या कार्यामागे सर्वसामान्यांचे, महिलांचे, वंचितांचे, विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांचे कल्याण केंद्रस्थानी असते याची लोकांना खात्री झाली आहे. म्हणूनच या जाणत्या लोकनेतृत्वाला वाढदिवसाच्या निमित्ताने खूपखूप शुभकामना देताना मनस्वी आनंद होत आहे.