Tue, June 6, 2023

इचल:कर्णबधीर तपासणी शिबीर
इचल:कर्णबधीर तपासणी शिबीर
Published on : 14 March 2023, 4:02 am
‘आयजीएम’मध्ये आज
कर्णबधिर तपासणी शिबिर
इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयामार्फत कर्णबधिर तपासणी शिबिर उद्या (ता. १५) आयोजित केले आहे. शिबिरात कर्णबधिरांची ऐकण्याची क्षमता व आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच कर्णबधिरांच्या समस्यांविषयी सामान्य लोकांना माहिती देणे, सांकेतिक भाषा शिकवण्यास प्राधान्य देणे, कर्णबधिर लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिराचा लाभ इचलकरंजी परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनामार्फत केले आहे.