न्यायालयाच्या सुचनेनंतरच मुश्रीफ ईडी समोर ः समरजीत घाटगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायालयाच्या सुचनेनंतरच मुश्रीफ ईडी समोर ः समरजीत घाटगे
न्यायालयाच्या सुचनेनंतरच मुश्रीफ ईडी समोर ः समरजीत घाटगे

न्यायालयाच्या सुचनेनंतरच मुश्रीफ ईडी समोर ः समरजीत घाटगे

sakal_logo
By

न्यायालयाच्या आदेशानेच
मुश्रीफ ‘ईडी’समोर हजर

समरजितसिंह घाटगे यांची टीका

कोल्हापूर, ता. १४ ः ‘उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानेच माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीसमोर हजर व्हावे लागले. न्यायालयाने त्यांना एकाही आरोपातून मुक्त केलेले नाही. त्यामुळे मुश्रीफ यांना न्यायालयाचा कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यांच्यावरील कारवाईबाबतची मुदत हा न्यायिक प्रक्रियेचा भाग आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. आज त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
घाटगे म्हणाले, ‘न्यायालयाने मुश्रीफांच्या याचिकेवर जो निर्णय दिला, तो स्वागतार्ह आहे. यामध्ये मुश्रीफांना न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. ईडीने समन्स बजावल्यानंतर मुश्रीफांचे वकील त्यांच्या जागी चौकशीसाठी गेले होते. मात्र, न्यायालयाने जो निर्णय दिला त्यामुळेच मुश्रीफांना स्वतः चौकशीला जावे लागले. त्यांनी ईडी कारवाईबाबत उच्च न्यायालयात तक्रार करणारी याचिका दाखल केली होती. मात्र त्यातील एकही बाब न्यायालयाने मान्य केलेली नाही. संताजी घोरपडे कारखान्यातील फसवणुकीबाबत म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने मुश्रीफ यांना एक महिन्याची मुदत दिली आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी आले होते. त्यावेळी मुश्रीफ मागील दाराने निघून गेले. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सामोरे जायला पाहिजे होते. अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक हे स्वतः ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. तर मुश्रीफांनी आपला वकील पाठवला. ‘ईडीचे अधिकारी आल्यावर स्वतः मुश्रीफ, त्यांची मुले, चालक, स्वीय सहाय्यक आणि त्यांचे चार्टर्ड अकौंटंट हे सर्व नॉट रिचेबल होते. यामागचे गौडबंगाल काय आहे?’