बालनाट्य स्पर्धा अंतिम फेरी निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालनाट्य स्पर्धा अंतिम फेरी निकाल
बालनाट्य स्पर्धा अंतिम फेरी निकाल

बालनाट्य स्पर्धा अंतिम फेरी निकाल

sakal_logo
By

रत्नागिरीचे ‘राखेतून उडाला मोर’ पहिले

राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १४ : एकोणीसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या मराठा मंदिर ए.के. देसाई हायस्कूलच्या ‘राखेतून उडाला मोर’ या बालनाट्याला पहिला क्रमांक मिळाला. नवी मुंबई ऐरोलीच्या शिव रणभूमी प्रतिष्ठान सेवा संस्थेच्या ‘तळमळ एका अडगळीची’ बालनाट्याला दुसरा तर भिलारेवाडी येथील आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या ‘बळी’ बालनाट्याला तिसरा क्रमांक मिळाला.
दरम्यान, येथील यशवंत भालकर फौंडेशनचे ‘या चिमण्यांनो परत फिरा‘ हे बालनाट्य अंतिम फेरीत सादर झाले होते. या बालनाट्यातील प्रमुख भूमिकेतील स्वराली संजय तोडकर हिला अभिनयाचे रौप्यपदक मिळाले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेची अंतिम फेरी जळगावातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात ७ ते १० मार्चदरम्यान झाली. त्यात २३ बालनाट्ये सादर झाली होती. त्याचा निकाल आज जाहीर झाला. संजय पेंडसे, रमाकांत मुळे, रमेश भिसीकर, चेतना वैद्य, केशव भागवत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
------

अन्य निकाल असे-

दिग्दर्शन : प्रथम प्रशांत निगडे (नाटक : तळमळ एका अडगळीची), द्वितीय संतोष गार्डी (राखेतून उडाला मोर), तृतीय मुग्धा भडगे (बळी)
नाट्यलेखन : प्रथम संध्या कुलकर्णी (बळी), द्वितीय संकेत तांडेल (अजब लोठ्यांची महान गोष्ट)
प्रकाशयोजना : प्रथम साईप्रसाद शिर्सेकर (राखेतून उडाला मोर), द्वितीय विनोद राठोड (ध्येयधुंद)
नेपथ्य : प्रथम मुकुंद लोखंडे (गोष्टींची स्टोरी), द्वितीय प्रवीणा धुमक (राखेतून उडाला मोर)
संगीत दिग्दर्शन : प्रथम निखिल भुते (राखेतून उडाला मोर), द्वितीय ओंकार तेली (तळमळ एका अडगळीची)
वेशभूषा : प्रथम वर्षा लोखंडे (गोष्टींची स्टोरी), द्वितीय विरीशा नाईक (तळमळ एका अडगळीची)
रंगभूषा : प्रथम निलम चव्हाण (तळमळ एका अडगळीची), द्वितीय वर्षा लोखंडे (गोष्टींची स्टोरी)
उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक (मुले) - नीरज हुलजुते (काश्‍मीर स्माईल), अर्जुन झेंडे (तळमळ एका अडगळीची), आर्यन वोलीज (बदला), सोहम पानबंद (गुहेतील पाखरं), प्रणीत जाधव (हलगी सम्राट)
उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक (मुली) - गायत्री रोहकले (अजब लोठ्यांची महान गोष्ट), सायुरी देशपांडे (ध्येयधुंद), स्वराली तोडकर (या चिमण्यांनो परत फिरा रे), अस्मी गोगटे (बळी), आर्या रायते (गोष्टीची स्टोरी)
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : आर्या देखणे (अजब लोठ्यांची महान गोष्ट), शर्वरी पवार (यम्मी, मम्मी, ठम्मी), कृपा म्हात्रे (रेस), तेजस्विनी ठक्कर (खिडकी), आस्था सोनी (काश्‍मीर स्माईल), मानस तोंडवळकर (तळमळ एका अडगळीची), श्‍लोक नेरकर (बदला), राजीव गानू (ध्येयधुंद).