चित्रपट महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रपट महोत्सव
चित्रपट महोत्सव

चित्रपट महोत्सव

sakal_logo
By

‘पुरशा‘ने जिंकली रसिकांची मने

कलानगरी मराठी फिल्म फेस्टीव्हलची आज सांगता

कोल्हापूर, ता. १४ ः येथे सुरू असलेल्या कलानगरी कोल्हापूर मराठी फिल्म फेस्टिव्हलमध्ये आज दीपक कदम दिग्दर्शित आणि ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांची भूमिका असलेल्या ‘पुरशा‘ या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले. वेगळ्या धाटणीच्या आणि समलिंगी संबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाला रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम म्हणाले, ‘अशा प्रकारचे चित्रपट महोत्सव हे मराठी चित्रपटसृष्टीचे भविष्य आहेत. विविध आशयसंपन्न चित्रपट या महोत्सवामध्ये पाहायला मिळतात. त्याशिवाय सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणाऱ्या लघुपटांचीही पर्वणी आहे.’
दिग्दर्शक दीपक कदम म्हणाले,‘आजवर पुरशा या चित्रपटाला चौदा मानांकने मिळाली. पण आमच्या टीमसाठी कलानगरी कोल्हापूर फेस्टीव्हलमध्ये चित्रपट दाखवणे आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणे ही आनंदाची गोष्ट आहे.’
महोत्सवात दिवसभर विविध चित्रपट व लघुपट दाखवण्यात आले. उद्या (बुधवारी) महोत्सवाची सांगता होणार असून सायंकाळी साडेसहाला पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. त्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी अवतरणार आहे.