आरटीओचे कामकाज ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीओचे कामकाज ठप्प
आरटीओचे कामकाज ठप्प

आरटीओचे कामकाज ठप्प

sakal_logo
By

89157
...

‘आरटीओ’चे कामकाज शंभर टक्के ठप्प

सर्वच कर्मचारी संपात सहभागी ः नोंदणी, परमीट, करभरणीसह एकही कामकाज झाले नाही

कोल्हापूर, ता. १४ ः प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून आज संपाला १०० टक्के पाठींबा मिळाला. सुमारे सव्वाशे कर्मचारी नसल्यामुळे कार्यालयातील एकही कामकाज झाले नाही. वाहन परवाना घेणे, नुतनीकरण करणे, परमीट घेणे, कर भरणे यासह अन्य कामकाज आज पूर्णपणे ठप्प झाले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथील सर्व सरकारी कर्मचारी आज जुनी पेन्शन लागू करण्यासाठी संपात सहभागी झाले. सकाळी कार्यालयीन वेळेत सर्वजण मैदानावर जमा झाले. तेथे त्यांनी घोषणाबाजी दिली. तेथून सर्वजण टाऊन हॉल बागेकडे गेले. त्यानंतर निघालेल्या मोर्चात त्यांनी सहभाग घेतला.
आरटीओमध्ये रोज हजारो ग्राहक येत राहतात. काहींना वाहन चालविण्याचा परवाना घ्यायचा होता, काहींना परवाना नुतनीकरण करायचे होते. काहींना परमीट घ्यायचे होते, तर काहींना कर भरायचा होता. यासह अन्य कामकाजासाठी ग्राहकांनी, वाहनधारकांनी कार्यालयात सकाळीच धाव घेतली होती. मात्र एकही कर्मचारी कार्यालयात नसल्यामुळे आज दिवसभरात कागदपत्रांचे पानही हलले नाही. मात्र राजपत्रित अधिकारी संपात सहभागी नसल्यामुळे त्यांना कार्यालयात बसून रहावे लागले. संपामुळे वाहनधारकांची कोंडी झाली. काहींचे परवाने नुतनीकरण करण्याचा शेवटचा दिवस होता, तेही झाले नसल्याचे सांगण्यात आले.