गुंड अमोल भास्करला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंड अमोल भास्करला अटक
गुंड अमोल भास्करला अटक

गुंड अमोल भास्करला अटक

sakal_logo
By

गुंड अमोल भास्करला अटक

कोल्हापूर, ता. १४ ः महिलेशी अश्‍लील वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात गुंड अमोल महादेव भास्कर (वय ३२, रा. जवाहरनगर, मेन रोड, कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. याबाबतचा गुन्हा राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला.
पोलिसांनी सांगितले की, भास्कर टोळीतील प्रमुख म्हणून पोलिसांकडे अमोल भास्करचे रेकॉर्ड आहे. त्याने सराफ व्यवसायाशी संबंधित असलेल्या ओळखीच्या महिलेचा विनयभंग केला आहे. त्याबाबत फिर्याद दाखल झाल्यामुळे पोलिसांनी भास्करवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्‍याचे आदेश देण्यात आले आहेत.