
गुंड अमोल भास्करला अटक
फोटो संग्रहीत घ्यावा.
...
गुंड अमोल भास्करला
विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक
कोल्हापूर, ता. १४ ः ओळखीच्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कुख्यात गुंड अमोल महादेव भास्कर (वय ३२, रा. जवाहरनगर, मेन रोड, कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. याबाबतचा राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, भास्कर टोळीतील प्रमुख म्हणून पोलिसांकडे अमोल भास्करचे रेकॉर्ड आहे. त्याने सराफ व्यवसायाशी संबंधित असलेल्या ओळखीच्या महिलेचा विनयभंग केला आहे. त्याबाबत फिर्याद दाखल झाल्यामुळे पोलिसांनी भास्करवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती निरीक्षक अनिल तनपुरे यांनी आज दिली.
अमोल भास्कर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याकडून यापूर्वी अनेक गुन्हे घडले आहेत. त्याच्यावर विनयभंगाची फिर्याद आल्यामुळे त्याला ताब्यात घेवून चौकशी करून अटक केली आहे. त्याच्याकडून अन्य कोणाला असा त्रास दिला जात होता काय याचीही माहिती घेतली जात आहे. त्याच्या दहशतीच्या भितीने कोणी फिर्याद दिलेली नसेल तर त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार करावी, असेही आवाहन तनपुरे यांनी केले आहे.