महिलेच्या गळ्यातील बोरमाळ लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेच्या गळ्यातील बोरमाळ लंपास
महिलेच्या गळ्यातील बोरमाळ लंपास

महिलेच्या गळ्यातील बोरमाळ लंपास

sakal_logo
By

घरासमोर फिरताना वृद्धेची
बोरमाळ हिसकावली

कोल्हापूर, ता. १४ - घरासमोरील रस्त्यावर फिरणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील दहा ग्रॅम सोन्याची बोरमाळ दुचाकीस्वारांनी हिसकावली. कळंबा रोड परिसरातील जामसांडेकर नगर येथे आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मंजुषा सुहास आळतेकर (वय ४७, रा. जामसांडेकरनगर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले की, मंजुषा आळतेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या आई माया शशिकांत पुणदीकर या घराबाहेर रोडवर फिरत होत्या. त्यावेळी मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी पुणदीकर यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सुमारे ४५ हजार रुपयांची बोरमाळ हिसडा मारून लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांनी गळ्यातील माळ मुठीत धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती माळ तुटली आणि काही भाग त्यांच्याच हातात राहिला. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांना शोध घेत आहेत.