
गडहिंग्लज संक्षिप्त
विद्यार्थ्यांना रोप भेट देऊन वाढदिवस
गडहिंग्लज : येथील किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी वरदा जळके हिचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. जळके कुटुंबीयांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना विविध जातीच्या फळ, फुलांच्या रोपांचे वाटप केले. वरदा व वडील अभिजित जळके यांच्या हस्ते रोपांचे वाटप झाले. सुमारे १५० रोपांचे वितरण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा अंजली हत्ती, डॉ. सरस्वती हत्ती, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे, शहजादी पटेल, सागर पाटील, संजय पाटील, संतोष मराठे, अनिल माने आदी उपस्थित होते.
------------------
घाळी महाविद्यालयात कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात ग्रीन केमिस्ट्री अॅप्रोच इन करंट रिसर्च सिनॅरिओ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. डॉ. सूरज सुतार यांनी मार्गदर्शन केले. संशोधन म्हणजे काय, आजच्या युगात ग्रीन संशोधनाचे असलेले महत्त्व याबाबत संवाद साधला. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्रा. स्नेहल जाधव यांनी स्वागत केले. डॉ. किरण पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. शिवानंद मस्ती, प्रा. अनिल मगर, प्रा. विवेक इंगळे, प्रा. सचिन माने, प्रा. रेश्मा नागरपोळे, प्रा. पंकज डाफले आदी उपस्थित होते. प्रा. मनिषा नाईक यांनी आभार मानले.