Thur, June 1, 2023

आजरा ः संक्षिप्त बातमी
आजरा ः संक्षिप्त बातमी
Published on : 15 March 2023, 1:35 am
ajr151.jpg
कोळिंद्रेच्या अरुण परीट
यांची शांतीसेनेत निवड
आजरा : मौजे कोळिंद्रे (ता. आजरा) येथील अरुण शंकर परीट यांची भारतीय सैन्यदलातून संयुक्त राष्ट्र संघ, शांतीसेना मोहिमेसाठी साऊथ सुदान या आफ्रिकी महाद्विपीय देशासाठी निवड झाली आहे. २००३ मध्ये त्यांची भारतीय सेनेच्या चिकित्सा विभागामध्ये निवड झाली होती. लखनौ, उत्तर प्रदेश येथे सैन्य प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जम्मू-कश्मीर येथील श्रीनगर, मच्छल सेक्टर, आसाम व गुजरात येथे त्यांनी २० वर्षे सेवा बजावली आहे.