ग्राहक दिन

ग्राहक दिन

89306

आयोगातील रिक्त पदे भरण्यासाठी आंदोलन छेडणार
ॲड. प्रताप जाधव ः जिल्हा ग्राहक बार असोसिएशनतर्फे ग्राहक दिन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः जिल्हा ग्राहक आयोगातील न्यायाधिशांची पदे रिक्त झाल्यामुळे न्यायासाठी येणाऱ्या ग्राहकांना देवळात देवच नाही, अशा उक्तीप्रमाणे न्याय मिळण्यास वेळ लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका निर्णयामध्ये दहा वर्षे वकिली झालेल्या वकिलांना परिक्षेद्वारे जिल्हा आयोग व राज्य आयोगामध्ये नियुक्ती करण्याचा नियम बनविण्याचे निर्णय राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार ग्राहक आयोगातील रिक्त न्यायाधिशांची पदे तत्परतेने भरण्यासाठी बार असोसिएशनच्यावतीने आंदोलन उभे करू, असे ग्राहक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रताप जाधव यांनी सांगितले. जिल्हा ग्राहक बार असोसिएशनतर्फे जागतिक ग्राहक दिन झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. ए. डी. भुमकर होते.
ॲड. राजेंद्र वायंगणकर यांनी जागतिक ग्राहक दिनाचा इतिहास सांगितला. ॲड. उमेश माणगावे यांनी नवीन ग्राहक कायद्यामधील तरतुदी स्पष्ट केल्या. तर ग्राहक आयोगाचे उपअधिक्षक माने यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. संदीप जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com