टपलाची जबाबदारी आता होमगार्डवर

टपलाची जबाबदारी आता होमगार्डवर

जिल्‍हा परिषद ...
...

टपालाची जबाबदारी आता होमगार्डवर

पंचायत समिती, आरोग्य केंद्रात नियुक्‍ती

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता.१५: जिल्‍हा परिषद, पंचायत समितीचे कर्मचारी रजेवर गेल्याने कामकाज ठप्‍प झाले आहे. सध्या तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर ही कार्यालये उघडण्यात येत आहेत. मात्र हा संप अधिक काळ सुरु राहिला तर नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. या सर्वांचा विचार करुन जिल्‍हा परिषदेने १२ पंचायत समिती व ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील टपाल सी‍विकारण्यासाठी होमगार्डची तात्‍पुरती नियुक्‍ती करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ११८ होमगार्डची नियुक्‍ती होणार असून, पुढील २४ तासात ते दिलेल्या संस्‍थेत कामावर रुजू होणार आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यां‍नी पुकारलेल्या संपाचे परिणाम आता हळूहळू दिसू लागले आहेत. सर्व शासकीय कामकाज ठप्‍प झाले आहे. जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामपंचायतींचे काम संपामुळे चांगलेच प्रभावीत झाले आहे. शासकीय पत्रव्यवहार स्वीकारण्यासाठीही काही ठिकाणी मनुष्यबळ उपलब्‍ध झालेले नाही. संप तत्‍काळ मिटण्याची चिन्‍हे दिसत नसल्याने आता किमान शासकीय पत्रव्यवहार अर्थात टपाल स्‍वीकारण्यासाठी मनुष्यबळ उपलब्‍ध करुन देण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. जिल्‍हाधिकारी कार्यालयात या कामासाठी होमगार्डची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता जिल्‍हा परिषदेनेही होमगार्ड नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्‍हा परिषदेत कंत्राटी मनुष्यबळ उपलब्‍ध आहे. मात्र १२ पंचायत समिती व ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत अनेक ठिकाणी मनुष्यबळ उपलब्‍ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा तर २४ तास सुरु राहते. त्यामुळे रात्रपाळीच्या वेळेत आलेल्या सुचनांची नोंद करण्याची व्यवस्‍था नाही. त्यामुळेच या ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत होमगार्डची नियुक्‍ती केली जाणार आहे. तसेच १२ पंचायत समितीत प्रत्येकी ३ होमगार्डची नियुक्‍ती केली जाणार आहे. ज्या त्या तालुक्यातील होमगार्डना, त्याच तालुक्यातील संस्‍थेत कामाची जबाबदारी दिली जाणार आहे. त्याबाबतची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाने सुरु केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com