जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

89296

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये
घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे इंटरव्ह्यू

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे पूल कॅम्पस इंटरव्ह्यू झाले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन केले होते. पॉलिटेक्निकबरोबर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, टेक्निकल कॅम्पस, पॉलिटेक्निक तळसंदे, के. पी. पाटील पॉलिटेक्निक मुदाळ येथील मेकॅनिकल विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, ‘‘अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसमोर नोकरीच्या चांगल्या संधी आहेत. ‘घाटगे-पाटील’सारख्या नामांकित कंपन्यांत कामाची संधी मिळेल.’’ सहायक एचआर विनायक भारती म्हणाले, ‘‘घाटगे-पाटील कंपनीत नवीन संकल्पना राबवून चांगले मनुष्यबळ विकसित करण्यात येत आहे. योग्य गरजूंना नोकरी मिळेल.’’
उपप्राचार्य एम. पी. पाटील, ‘घाटगे-पाटील’चे सहायक एचआर विकास सावंत, प्रा. सुदर्शन साळोखे, प्रा. महेश रेणके, प्रा. अक्षय करपे, प्रा. बी जी. शिंदे, सहायक रजिस्ट्रार सचिन जडगे उपस्थित होते. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. नितीन माळी यांनी प्रास्ताविक, प्रा. धैर्यशील नाईक यांनी सूत्रसंचालन केले. संस्थाध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष सतेज पाटील, ट्रस्टी ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.