Tue, June 6, 2023

गुरू शिष्य प्रदर्शनाला प्रतिसाद
गुरू शिष्य प्रदर्शनाला प्रतिसाद
Published on : 15 March 2023, 4:41 am
89320
गुरू-शिष्य चित्र प्रदर्शनाला प्रतिसाद
कोल्हापूर ः रेखासम्राट टी. के. वडणगेकर यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या गुरू-शिष्य चित्र-शिल्प प्रदर्शनाला रसिकांचा प्रतिसाद मिळतो आहे. या प्रदर्शनात विजय टिपुगडे, प्रतीक्षा व्हनबट्टे, इंद्रजित बंदसोडे, बबन माने, गजेंद्र वाघमारे, आरिफ तांबोळी, संतोष पोवार, किशोर राठोड, नागेश हंकारे, शैलेश राऊत, पूनम राऊत, मनोज दरेकर, अभिजित कांबळे, मनीपद्म हर्षवर्धन, प्रवीण वाघमारे, विजय उपाध्ये, राहुल रेपे, विलास बकरे, शिवाजी मस्के, चेतन चौगुले आदींच्या कलाकृती मांडल्या आहेत. हे प्रदर्शन शनिवार (ता. १८) पर्यंत सकाळी साडे दहा ते रात्री साडेआठ या कालावधीत खुले राहणार आहे.