शिवाजी विद्यापीठाचा महिला क्रिकेट संघ ‘अखिल भारतीय’ स्पर्धेसाठी पात्र

शिवाजी विद्यापीठाचा महिला क्रिकेट संघ ‘अखिल भारतीय’ स्पर्धेसाठी पात्र

89321

विद्यापीठाचा महिला क्रिकेट संघ
अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्र

पहिल्यांदाच संधी; पश्‍चिम विभागीय स्पर्धेत मानांकन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः शिवाजी विद्यापीठाच्या महिला क्रिकेट खेळाडूंनी इंदोर विद्यापीठाचा ४३ धावांनी पराभव करून पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत मानांकन मिळवले. म्हैसूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला आहे. या संघाला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
कलिंगा युनिव्हर्सिटी (भुवनेश्वर) येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने धवल कामगिरी केली. या स्पर्धेत या संघाने इंदोरच्या देवी अहिल्या विद्यापीठाच्या संघास ४३ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना शिवाजी विद्यापीठाने २० षटकांत १४३ धावा केल्या. उत्तरदाखल फलंदाजीस उतरलेल्या इंदोर विद्यापीठाच्या संघाचा खेळ १०० धावांत आटोपला. गुजरात टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ संघास शिवाजी विद्यापीठ संघांने ४३ धावात गुंडाळून केवळ दोन षटकांत लक्ष्य गाठले. त्यानंतरच्या सामन्यात वीर वर्धमान विद्यापीठ गुजरात संघाने १३९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल शिवाजी विद्यापीठ संघाने हे लक्ष्य एक गडी गमावून पूर्ण केले. तिसऱ्या सामन्यात शिवाजी विद्यापीठ संघाने सौराष्ट्र विद्यापीठावर विजय मिळवला. सौराष्ट्र संघाने ६३ धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल शिवाजी विद्यापीठाच्या संघाने नाबाद ६५ धावा करत विजय मिळविला. या संघाचे व्यवस्थापक, मार्गदर्शक म्हणून डॉ. रोहित पाटील, प्रा. देवदत्त महात्मे कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com