प्रशासनाची तयारी

प्रशासनाची तयारी

रोजंदारी आले नसल्याने मनपा
घेणार ३५१ खासगी कर्मचारी

आजपासून कचरा उठाव; सफाईचे काम करणार

कोल्हापूर, ता. १५ ः रोजंदारी कर्मचारी कामावर हजर झाले नसल्याने महापालिका प्रशासनाने टिप्परसाठी, ड्रेनेज लाईनसाठी तसेच ८१ प्रभागांत प्रत्येकी दोन याप्रमाणे ३५१ असे खासगी एजन्सीकडून कर्मचारी उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे उद्या (दि.१६) कचरा उठावासह भागातील स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेकडे २०० रोजंदारी कर्मचारी आहेत. प्रशासनाने कर्मचारी संघाला ‘त्या’ कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याबाबतचे पत्र दिले होते, पण ते कामावर हजर झाले नसल्याने कचरा व सफाईचे काम दुसऱ्या दिवशीही ठप्प राहिले. त्यामुळे कंत्राटी चालकांकडून टिप्परमधून कचरा उठावाचा प्रयत्न झाला. तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पावरही टिप्परमधून कचरा काढण्यासाठी १० कंत्राटी कर्मचारी नेमले होते. रोजंदार कर्मचारी कामावर आले नसल्याने प्रशासनाने उद्यापासून खासगी एजन्सीकडून कर्मचारी घेण्याचे नियोजन केले आहे. त्यात १६९ टिप्परसोबत १६९ सहायक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच ८१ प्रभागांमध्ये रस्ता तसेच गटर सफाईसाठी प्रत्येक प्रभागात २ असे १६२ कर्मचारी घेतले जाणार आहेत. तर ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्यासाठी व जेट मशीन चालवण्यासाठीही २० कर्मचारी घेतले जाणार आहेत. याशिवाय कचरा उठाव गतीने करण्यासाठी दोन जेसीबी व चार डंपर भाड्याने घेण्यात येणार आहेत. उद्यापासून ही यंत्रणा राविवण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून केले आहे.

रोजंदारींना फटका?
रोजंदारी कर्मचारी हजर झाले नसल्याने प्रशासन त्यांची सेवा खंडित करण्याची शक्यता आहे. यानुसार कारवाई झाल्यास आतापर्यंत झालेली सेवा खंडित होऊन ज्यादिवशी कामावर हजर होतील, तो दिवस पहिला पकडला जातो. त्यामुळे अनेकांची ज्येष्ठता संपुष्टात येऊन ते नव्याने कर्मचारी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com