सोनार समाजातर्फे निदर्शने आयोजित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनार समाजातर्फे निदर्शने आयोजित
सोनार समाजातर्फे निदर्शने आयोजित

सोनार समाजातर्फे निदर्शने आयोजित

sakal_logo
By

‘विविध मागण्यांसाठी सोनार
सामाजातर्फे शनिवारी उपोषण’

कोल्हापूर, ता. १५ : नवीन कायद्यांतर्गत सोनार कला संपविली आहे. १९६३ पासून आजपर्यंत सोनार समाजासाठी महामंडळ व्हावे, या मागणीसाठी धडपड सुरू आहे. या मागण्यांकरीता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण शनिवारी (ता. १८) सकाळी ११ ते सायंकाळी पाच वेळेत करण्यात येणार आहे. दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे उपोषण केले जाईल, अशी माहिती पंचाल सोनार समाजाचे अध्यक्ष अनिल पोतदार- हुपरीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोतदार म्हणाले, ‘‘सोनार समाजातील कलावंत आणि कारागीरांसाठी बार्टी, महाज्योती, सारथी आदी धर्तीवर स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी. आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्याअंतर्गत बिनव्याजी व विनातारण पाच लाख ते एक कोटी कर्ज पुरवठा व्हावा. सोनार, इतर बलुतेदार, ओ.बी.सी. जातीसाठी उपसंवर्ग निर्माण करून स्वतंत्र पाच टक्के आरक्षण द्यावे. सोनार समाजातील सोनार काम करणाऱ्या कारागीरास त्यांच्या उतार वयात हालअपेष्टा होऊ नये, म्हणून कलावंत मानधन योजनेच्या धर्तीवर दरमहा मानधन योजना सुरू करावी, या मागण्यांसाठी हे उपोषण असेल.’’ विजय घाटे, रामदास रेवणकर, अनिष पोतदार, नचिकेत भुर्के, पांडुरंग पोतदार, नंदू वेलणकर, कौस्तुभ पोतदार आदी उपस्थित होते.