तळवडेतील एकास १६ लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळवडेतील एकास 
१६ लाखांचा गंडा
तळवडेतील एकास १६ लाखांचा गंडा

तळवडेतील एकास १६ लाखांचा गंडा

sakal_logo
By

तळवडेतील एकास
१६ लाखांचा गंडा
ऑनलाईन फसवणूक; कर्जाचे आमिष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः बंद झालेली विमा पॉलिसी सुरू करून त्यावर ७० लाख रुपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तळवडे येथील एका व्यक्तीला तब्बल १५ लाख ८० हजार ८३० रुपयांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला. याबाबत चंद्रशेखर नारायण मल्हार (वय ५५, रा. तळवडे परबवाडी) यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तुम्हाला लॉटरी लागली आहे, कर्ज मिळवून देतो, व्यवसायासाठी गुंतवणूक करतो, अशी विविध आमिषे दाखवून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. मोबाईलवर आलेल्या मेसेज किंवा फोनच्या माध्यमातून अशा प्रकारे अनेक सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली जात आहे. अनेक जण या प्रकारांना बळी पडत आहेत. असाच प्रकार तळवडे-परबवाडी येथील चंद्रशेखर मल्हार यांच्या बाबतीत घडला. त्यांची एका खासगी कंपनीची विमा पॉलिसी बंद झाली होती. ती पुन्हा सुरू करून देतो, अशा स्वरुपाचा त्यांना मोबाईलवर फोन आला. आपण संतोष भोसले नामक व्यक्ती असून संबंधित कंपनीत काम करीत आहे, असे त्याने मल्हार यांना सांगितले. ही बंद पॉलिसी सुरू करून त्यावर तब्बल ७० लाख कर्ज मिळवून देतो, असे आमिषही त्याने दाखविले. याबाबत ''श्वेता मॅडम'' तुमच्याशी बोलतील, असे सांगून ही पॉलिसी सुरू करण्यासाठी तसेच कर्ज मिळवून देण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. त्याच्या आमिषाला बळी पडून मल्हार यांनी त्याच्या सांगण्याप्रमाणे तब्बल १५ लाख ८० हजार ८३० एवढी रक्कम त्याने सांगितलेल्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केली; मात्र त्यानंतर संबंधिताकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. याबाबत रितसर तक्रारही दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे तपास करीत आहेत.