मनपा कुस्ती स्पर्धेसाठी निदर्शन

मनपा कुस्ती स्पर्धेसाठी निदर्शन

89349

महापालिका घेणार एप्रिलमध्ये कुस्ती स्पर्धा
प्रशासकांचे कृती समितीला आश्‍वासन; छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने

कोल्हापूर, ता. १५ : महिनाभरात महापालिका कुस्ती स्पर्धेचे आयोजन करावे. शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुस्तीसम्राट युवराज पाटील केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी यांसह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने नवोदित पैलवानांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिल्यानंतर एप्रिलमध्ये कुस्ती स्पर्धा घेण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.
कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला. त्यांनी दिलेल्या कुस्तीचे विचार पुढे नेणे हे कर्तव्य आहे. महापालिका १९९१ पासून महापौर केसरी कुस्ती स्पर्धा घेत आहे. मार्च २०२० मध्ये स्पर्धेचे आयोजन केले होते. पण, कोरोनामुळे स्थगित केल्या. त्यानंतर सर्व स्पर्धा व कार्यक्रम सुरू झाले. महापालिकेने वर्षभरात अनेक क्रीडा स्पर्धा घेतल्या. कुस्ती स्पर्धेचा निधी राखून ठेवला आहे. महिनाभरात कुस्ती स्पर्धेचे त्वरित आयोजन करावे. शिक्षण समिती प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुस्ती सम्राट युवराज पाटील केसरी कुस्ती स्पर्धा घेते. त्या स्पर्धाही घेणे गरजेचे आहे. नागरिक बक्षिसे, अन्य खर्च देण्यास तयार आहोत. ऐतिहासिक खासबाग मैदान सुस्थितीत राहावे. तिथे वॉचमन, कोच द्यावा.
उपायुक्त रविकांत आडसूळ, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, वसंत पाटील, रामा कोवाड, बाबा रानगे, पवन भांदिर्गे, विनायक वास्कर, सुदर्शन पाटील, निशिकांत पाटील, कृष्णा पाटील, राजू मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, महादेव पाटील, सुरेश कदम, पप्पू सुर्वे, रंजीत पवार, विनोद डुणुंग उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com