
आत्महत्येस प्रवृत्त दोघांना अटक
दोन फोटो -
...
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी
पतीसह सासूला अटक
कोल्हापूर, ता. १५ ः दीड वर्षाच्या मुलासह विवाहितेने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी आज पती आणि सासूला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी अनिस अन्वर निशाणदार आणि सायराबानू अन्वर निशाणदार (दोघे. रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत आत्महत्या केलेल्या विवाहितेचा भाऊ तोहीब फैय्याज बागवान याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार ही कारवाई केल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, यातील संशयित आरोपी अनिस याने फिर्यादी यांची बहिण रुकसार अनिस निशाणदार हिला तुझ्या आईने तुझे लग्न तुमच्या घरी दारात करून दिले नाही. लग्नात मानपान केला नाही, असे म्हणून शिविगाळ, मारहाण करण्याबरोबरच उपाशीपोटी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून रुकसार हिने तिचा मुलगा उमर या दीड वर्षाच्या मुलासह १३ मार्चला दुपारी रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. २२ नोव्हेंबर २०२० नंतर एक महिन्यापासून ते ११ मार्च २०२३ पर्यंत वेळोवेळी पट्टणकोडोली आणि रंकाळा टॉवर येथील राहत्या घरी हा छळ केला आहे. अनिसच्या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती अनिस आणि सासू सायराबानू यांना अटक केली असल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले.