केएमटी संप

केएमटी संप

केएमटी कर्मचाऱ्यांचा
३० मार्चपासून
संपावर जाण्याचा इशारा

कोल्हापूर, ता. १५ ः सातव्या वेतन आयोगासह केएमटी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर केएमटी वर्धापन दिनापूर्वी ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा केएमटीच्या ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनने दिला आहे.
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे, ज्येष्ठतेप्रमाणे ड्यूटी लावणे, दुरुस्त केलेल्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करणे यांसह इतर मागण्यांबाबत प्रशासकांकडे संपाची नोटीस दिली आहे. ३० मार्चपर्यंत निर्णय घेतला नाही, तर त्या दिवशी मध्यरात्रीपासून केएमटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. केएमटीच्या वर्धापन दिनाच्या तोंडावर नाईलाजास्तव नोटीस द्यावी लागली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. आमच्या संघटनेबरोबर चर्चा करून वर्धापन दिनापूर्वी निर्णय द्यावेत, असे आवाहनही निवेदनात केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com