
विद्यापीठ परीक्षेत आठ ‘कॉपी’ करणारे सापडले
विद्यापीठ परीक्षेत सापडले
आठ कॉपीबहाद्दर
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेत बुधवारी गैरमार्गाचा (कॉपी) अवलंब करणारे आठ परीक्षार्थी सापडले. त्यात सांगली जिल्ह्यातील सहा आणि सातारा जिल्ह्यामधील दोन विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्यांच्यावर परीक्षा प्रमाद समितीच्या नियमानुसार कारवाई होणार आहे. विद्यापीठातर्फे बुधवारी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बी. आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात आल्या. त्यासाठी एकूण १६४० परीक्षार्थी उपस्थित होते. या परीक्षेदरम्यान विद्यापीठाच्या भरारी पथकाने कारवाई करत आठ परीक्षार्थींना कॉपी करताना पकडले. त्याची नोंद परीक्षा प्रमाद समितीकडे झाली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.