जिल्हाधिकारी राहुल रेखावार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी राहुल रेखावार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार

जिल्हाधिकारी राहुल रेखावार

sakal_logo
By

बँकांनी ''झीरो पेंडन्सी'' मोहीम राबवावी

जिल्हाधिकारी राहुल रेखावार : उद्दिष्टे अपूर्ण असणाऱ्यांना नोटीस काढा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी ''झीरो पेंडन्सी'' मोहीम गतीने राबवत सर्व कर्ज प्रकरणे मार्चअखेर निकाली काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची आज बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘जिल्ह्यातील जास्ती-जास्त लोकांना शासनाच्या व महामंडळांच्या योजनांचा लाभ दिला पाहिजे. बँकांनी मार्च २०२३ अखेर वार्षिक पतपुरवठा आराखड्यासह शासकीय व महामंडळांच्या योजनांची उद्दिष्टपूर्ती करावी. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्राचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. पीक कर्जासहित कृषी क्षेत्राचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे. शासकीय योजनांच्या कर्ज प्रकरणांबाबत जागृतता निर्माण होण्यासाठी बँकांनी तालुकानिहाय कार्यशाळा घ्यावी. कर्ज वाटपात अत्यल्प काम झालेले शासकीय विभाग, महामंडळे अथवा बँकांची कामगिरी सुधारण्यासाठी संबंधितांना अग्रणी बँकेने नोटीस द्यावी. कोल्हापूर जिल्ह्यात २०२२-२३ साठी १७ हजार ९८० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. यामध्ये, डिसेंबरअखेर २० हजार ९४८ कोटींची (११७ टक्के) उद्दिष्टपूर्ती झाली आहे. कृषी पायाभूत विकास निधी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, स्टँडअप इंडिया, पीएमईजीपी, सीएमईजीपी, पीएम स्वनिधी तसेच महामंडळाच्या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देऊन नवनवीन व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन दिले पाहिजे.’
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, ‘बॅंकांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून गरजू नागरिकांची कर्ज प्रकरणे गतीने मंजूर करावीत. बँका आणि विविध महामंडळांनी परस्पर समन्वय ठेवून लाभार्थ्यांना लाभ द्यायला हवा.’ यावेळी, आरबीआयचे वित्तीय समावेशन विभागाचे व्यवस्थापक विजय कोरडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे उपस्थित होते.
................

`जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्याच्या डिसेंबर २०२२ अखेर सूक्ष्म, लघू व मध्यम क्षेत्राचे उद्दिष्ट १४३ टक्के पूर्ण झाले आहे. प्राथमिक क्षेत्राचे उद्दिष्ट ९५ टक्के झाले आहे. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत २०२२-२३ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला ८ हजार ६०० बचत गटांमध्ये २११ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे.माविमअंतर्गत १६२१ बचत गटांमध्ये ६५ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे.
गणेश गोडसे, बँक व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक