रविवार पेठेत मारामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविवार पेठेत मारामारी
रविवार पेठेत मारामारी

रविवार पेठेत मारामारी

sakal_logo
By

रविवार पेठेत घरात घुसून मारहाण
कोल्हापूर, ता. १५ ः पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग धरून आज तिघा तरुणांनी रविवार पेठेतील कांबळे यांच्या घरात घुसून महिलांना मारहाण केली. यामध्ये गीता कांबळे (वय ४५) व कमल कांबळे (६०) या जखमी झाल्या. यावेळी दगडफेक केल्यामुळे घराचेही किरकोळ नुकसान झाले. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले, की रविवारी दुपारी रंगपंचमीदिवशी फिर्यादी अरुण कांबळे यांचा मुलगा स्वप्नील याने शाहूपुरीतील एका मित्राची दुचाकी आणली होती. ही दुचाकी त्याने घरासमोर उभी केली होती. यावेळी संशयित अक्षय एकनाथ हत्तीकर, अजय भैरू हत्तीकर व विनोद एकनाथ हत्तीकर (तिघेही रा. रविवार पेठ) यांनी शिवीगाळ व मारहाण केली होती. यावेळी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून या तिघांनी आज कांबळे यांच्या घरात घुसून महिलांना मारहाण केली. यात त्यांच्या हाताला जखम झाली आहे. यावेळी दगडफेक केल्यामुळे घराचेही किरकोळ नुकसान झाले. यामुळे तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला.