ईपीएससाठी रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईपीएससाठी रास्ता रोको
ईपीएससाठी रास्ता रोको

ईपीएससाठी रास्ता रोको

sakal_logo
By

89368

ईपीएस पेन्शनरांचे
रास्ता रोको आंदोलन
कोल्हापूर, ता. १५ : ईपीएस पेन्शनरांना दर महिन्याला साडेसात हजार पेन्शन मिळावी, त्यांच्या कुटुंबाला मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जाव्यात यासाठी ईपीएस राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने कावळा नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
देशाच्या औद्योगिक, सार्वजनिक, सहकार व खासगी असे ७० लाख सेवानिवृत्त कर्मचारी ईपीएस-९५ योजनेंतर्गत येतात. त्यांनी ३५ ते ४० वर्षे सेवा करून देशाची प्रगती साधली. सेवानिवृत्तीनंतर त्यांची दयनीय अवस्था आहे. एका बाजूला पेन्शन फंडात काहीही अनुदान नसताना सरकार विविध गटांतील लोकांसाठी लोककल्याच्या अनेक चांगल्या पेन्शन योजना सुरू करत आहे, तर दुसरीकडे ईपीएसकडे ४१७ ते १२५० रुपये पेन्शन फंडात भरणाऱ्यांना सरासरी ११७० रुपये पेन्शन देत आहे. महागाई वाढली तरीही यामध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे शासनाने याचा विचार करून पेन्शनमध्ये वाढ करावी, अशी मागणीही केली. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष बी. एस. किल्लेदार, शहराध्यक्ष लालासाहेब गायकवाड, राजू परांडेकर, आर. डी. पाटील, सुभाष सावंत, प्रकाश भोसले, दिलीप पाटील, सुरेश मगदूम, उमेश कसबेकर उपस्थित होते.