Mon, May 29, 2023

अपघात
अपघात
Published on : 15 March 2023, 7:17 am
कार अपघातात चौघे जखमी
कोल्हापूर ः कोल्हापूर-गारगोटी मार्गावर कारचा ॲक्सल तुटल्याने लहान मुलासह तीन महिला किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः गारगोटीहून कोल्हापूरकडे कारने महिला प्रवासी येत होत्या. यात चार महिला व दोन लहान मुले होती. कार कळंबा कारगृहासमोर येताच तिचा ॲक्सल तुटला. टायर फुटला तेव्हा गाडी दुभाजकाला धडकून सिग्नललाही धडक दिली. अपघात घडताच परिसरातील नागरिकांना धाव घेतली. जखमीना तातडीने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करून कार बाजूला केली. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले.