पोलिस वृत्त एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त एकत्रित
पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

sakal_logo
By

हॉर्न वाजविला म्हणून तरुणाला मारहाण

कोल्हापूर ः महावीर गार्डन येथे हॉर्न वाजविला म्हणून तरुणाला मारहाण झाली. सुरज विष्णू पाटील असे जखमीचे नाव आहे. त्याचे वडील विष्णु दगडू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पाटील यांचा मुलगा सोमवारी (ता.१३) रात्री साडेअकराच्या सुमारास घरी येताना महावीर गार्डन येथे तीन पुरूष आणि दोन महिला उभ्या होत्या. त्यावेळी सुरजने हॉर्न वाजविल्यामुळे त्याला त्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार होऊन शस्त्रक्रीया करावी लागली. त्यामुळे बुधवारी रात्री उशिरा याची फिर्याद दाखल झाली असून अज्ञातांचा पोलिस शोध घेत आहेत.
--------------

सिद्धार्थनगरात मारहाण, चौघांवर गुन्हा

कोल्हापूरः चेष्टा केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून सिद्धार्थनगरात झालेल्या मारहाणीत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. रोहन कर्पे, करण भोजे, अलोक येळणकर आणि अभिषेक कर्पे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले. याची फिर्याद जखमी प्रमोद विनोद दळवी यांनी दिली. मारहाणीत प्रमोद, श्रेयस, प्रज्वल दळवी, सुजल बनगे जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी आणि संशयित हे ओळखीचे असून चेष्टेतून वाद होऊन ही मारामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------

सांडपाण्याच्या वादातून मारहाण

कोल्हापूरः सांडपाण्याच्या वादातून बुधवारी (ता.१५) रात्री साडेनऊ वाजता शिवाजी पेठेतील सरनाईक कॉलनीत झालेल्या मारामारीत संशयित आबा सरनाईक याच्यावर गुन्हा दाखल झाला. याची फिर्यादी जखमी सचिन अशोकराव माने यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपींमध्ये सांडपाणी जाण्याच्या कारणावरून वाद आहे. फिर्यादी सचिन याने कट्टा का तोडलास म्हणून विचारले असता संशयित आरोपी आबा याने शिवीगाळ करून अंगावर धावून जावून स्टीलची किटली सचिनच्या डोक्यात मारून जखमी केले. सचिनने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.