
इंदूमती आवाडे यांना अभिवादन
ich161.jpg
89415
इचलकरंजी : डीकेटीईमध्ये इंदुमती आवाडे यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी कल्लाप्पाण्णा आवाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
इंदुमती आवाडे यांना अभिवादन
इचलकरंजी ः येथील डीकेटीईच्या वतीने इंदुमती आवाडे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. खजिनदार प्रकाश दत्तवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, ट्रस्टी अशोक सौंदत्तीकर, स्वानंद कुलकर्णी, चंद्रशेखर शहा, रवि आवाडे, प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे आदी उपस्थित होते.
---------
स्वप्नील आवाडे यांचा सत्कार
इचलकरंजी ः येथील विक्रमनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या मासिक बैठकीत स्वप्नील आवाडे यांची इचलकरंजी सुतगिरणी (आयको) आणि आवाडे जनता बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वप्नील आवाडे यांचा सत्कार केला. संघटनेला सहकार्य केल्याबद्दल श्रीनिवास भट्टड, खुतबुद्दिन मोमीन यांचा आवाडे यांच्याहस्ते सत्कार झाला. अध्यक्षस्थानी अशोकराव आरगे होते. किरण कटके, रुद्राक्ष स्वामी, नारायण दुरुगडे, बिसमिल्ला गैबान, वसंत वेटाळे यांनी मनोगत व्यक्त केले. गंगाराम जाधव, आनंदराव नेमिष्टे, युसुफ तासगावे, आनंदराव आवळे, अशोक धोतरे, कल्लाप्पा कांबळे, पांडुरंग कुंभार, सुशिला बोंगार्डे, शांताबाई चव्हाण, हौसाबाई गायकवाड व सरला राठी उपस्थित होते. स्वागत विठ्ठल सुर्वे यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष राजाराम बोंगार्डे यांनी केले. आभार विष्णुपंत नेतले यांनी मानले.