Mon, June 5, 2023

घाळी महाविद्यालयात भित्तीपत्रक अनावरण
घाळी महाविद्यालयात भित्तीपत्रक अनावरण
Published on : 16 March 2023, 11:57 am
घाळी महाविद्यालयात भित्तीपत्रक अनावरण
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त भित्तीपत्रकाचे अनावरण केले. इंग्रजी वाणिज्य विभागातर्फे हे भित्तीपत्रक अनावरण केले. सरस्वती स्वामी हिने हे भित्तीपत्रक तयार केले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आरती चोथे हिने ग्राहक हक्क दिनाची माहिती सांगितली. उपप्राचार्य अनिल उंदरे, विभाग प्रमुख डॉ. मनोहर पुजारी, प्रा. सचिन जानवेकर, डॉ. नागनाथ मासाळ, डॉ. नीलेश शेळके, डॉ. सरला आरबोळे, डॉ. सरोज बिडकर, प्रा. राजश्री म्हंकावे, प्रा. प्रमोद पुजारी, प्रा. पूजा पाटील आदी उपस्थित होते. सुप्रिया जाधव हिने सूत्रसंचालन केले. सानिका पाटील हिने आभार मानले.