विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यशाळा
विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यशाळा

विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यशाळा

sakal_logo
By

89443

विकास करताना निसर्गाचे संरक्षण गरजेचे
प्रा. डॉ. श्रुती जोशी ः ‘विवेकानंद’मध्ये भौगोलिक संशोधनपद्धती कार्यशाळा


कोल्हापूर, ता. १६ ः शाश्वत विकासामध्ये भविष्याचा विचार केला जातो. त्यामुळे भौगोलिक संशोधनात शाश्वत विकास ही संकल्पना येणे अपेक्षित आहे. मानवाने नैसर्गिक संसाधनांचे अपरिमित शोषण केले आहे. विकास करताना निसर्गाचे भान राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे मत विवेकानंद कॉलेजमध्ये आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी बीजभाषणात केले. भूगोल विभाग आयोजित कॉमर्स कॉलेज क्लस्टरच्या माध्यमातून ‘शाश्वत विकासासाठी आधुनिक भौगोलिक संशोधन पद्धती’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. क अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार होते.
पहिल्या सत्रात भूगोल अभ्यासमंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बी. एस. जाधव यांनी भूगोलशास्त्रातील आधुनिक संशोधन पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात विलिंग्डन कॉलेज, सांगलीचे डॉ. रत्नदीप जाधव यांनी नागरीकरण अभ्यासातील जी.आय.एस. ची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले, तर तिसऱ्या सत्रात राजाराम कॉलेजमधील डॉ. आर. एस. शिकलगार यांनी पीक प्रारूप विश्लेषणामधील दिवा जी.आय.एस. ची उपयोगिता या विषयावर मांडणी केली. प्रा. धीरज पाटील, प्रा. ऐश्वर्या हिंगमीरे उपस्थित होते. प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. जी. एस. उबाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. समीक्षा फराकटे, प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. डॉ. सुनील भोसले यांनी आभार मानले.