कर्मचारी संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी संप
कर्मचारी संप

कर्मचारी संप

sakal_logo
By

बांगड्या घेवून महिला ‘त्या’ कर्मचाऱ्यांमागे

सिंचन भवनमधील प्रकार ः अनेकांनी ठोकली कार्यालयाबाहेर धूम


कोल्हापूर, ता. १६ : बेमुदत संपाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सिंचन भवन येथे काही कर्मचारी कामावर आल्याचे लक्षात आल्यानंतर आंदोलनातील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेत बांगड्यांचा आहेर करण्याचा निर्णय घेतला. महिला बांगड्या घेवून आल्याचे समजल्यानंतर जे काही कर्मचारी कामावर हजर होते, त्यांनी तेथून पळ काढला. काही कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृहाचाही आसरा घ्यावा लागला. तर, काही कर्मचारी कार्यालयात सही करुन मोर्चात सहभागी झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ असा नारा देत शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आजच्या तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी कामावर बरिष्कार टाकत संपात सहभाग घेतला आहे. दरम्यान, आज काही कर्मचारी शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी आपआपल्या कार्यालयात जावून सही करुन पुन्हा आंदोलनात सामील झाल्याचे चित्र आहे. सिंचन भवनमध्येही कामावर हजर झालेल्या काही कर्मचाऱ्यांची माहिती टाऊन हॉल येथे आंदोलनात सहभागी झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना समजली. त्यानंतर या महिला कर्मचाऱ्यांनी तत्काळ सिंचन भवन गाठले आणि कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर धूम ठोकली. कर्मचाऱ्यांनी निर्भिड होवून आपल्या मागण्या मान्य करुन घेतल्या पाहिजे. कोणीतरी दबाव टाकतो म्हणून काम कामावर हजर राहू नका, असा इशारा या महिला कर्मचाऱ्यांनी दिला. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर जे कर्मचारी कामावर हजर होते, ते तेथून टाऊन हॉल येथील आंदोलनस्थळी परत आले.