दानोळी कुस्ती मैदानात उमेश चव्हाण विजेता

दानोळी कुस्ती मैदानात उमेश चव्हाण विजेता

89448

दानोळी : येथे विजेता उमेश चव्हाण याला बक्षीस रावसो भिलवडे, बंडू राऊत, सावकर दळवी, रामचंद्र शिंदे, रामचंद्र वाळकुंजे आदींच्या उपस्थितीत दिले.

दानोळी कुस्ती मैदानात उमेश चव्हाण विजेता
यात्रा, उरुसानिमित्त आयोजन; लहान-मोठ्या २०० चटकदार कुस्त्या

दानोळी, ता. १६ ः येथील खंडोबा देवाची यात्रा व हजरत पीर गैबीसाहेब उरुसानिमित्त घेतलेल्या कुस्ती मैदानात ५१ हजार रुपयांसाठी झालेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरच्या शाहू आखाडा तालमीचा मल्ल उमेश चव्हाण याने इचलकरंजीतील व्यंकोबा तालमीचा मल्ल अभिजित कणेरे याला अवघ्या साडेचार मिनिटांत एकचाक डावावर आस्मान दाखवले. चुरशीच्या झालेल्या या कुस्तीने शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
माजी सरपंच बापूसो दळवी यांच्या हस्ते मैदानाचे उद्‍घाटन झाले. अध्यक्षस्थानी शरद साखर कारखान्याचे संचालक रावसाहेब भिलवडे होते. मैदानात लहान-मोठ्या एकूण २०० चटकदार कुस्त्या झाल्या. त्याचबरोबर महिलांच्या १४ कुस्त्या झाल्या. ३१ हजार रुपयांसाठी झालेल्या दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरच्या शाहू आखाडा तालमीचा मल्ल बंटीकुमार व बेनापूर तालमीचा मल्ल अभी देवकर यांच्यात झाली. ४० मिनिटांनंतर कुस्ती बरोबरीत सोडवली.
तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पृथ्वीराज पोवार (हंडे पाटील) याने किरण जाधव (शाहू आखाडा) याच्यावर विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाची अनिकेत खंबाळे (बेनापूर) व हर्षद दानोळे (मोतीबाग) यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडवली. मैदानात महिलांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. यामध्ये प्रतीक्षा देबाजे (शिरोळ) व अंकिता भातले (इचलकरंजी) विजेती ठरली. तसेच विजेती श्रेया पाटील (दानोळी- क्रीडा प्रबोधिनी, कोल्हापूर) व तेजस्विनी यादव, (इचलकरंजी) यांच्यात चटकदार कुस्त्या झाल्या.
या वेळी विठ्ठल मोरे, शंकर पुजारी, महादेव धनवडे, रामचंद्र शिंदे, गुंडू दळवी, सतीश मलमे, राजकुमार पाराज, रामचंद्र वाळकुंजे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सचिन राऊत, उपाध्यक्ष गणेश साळोखे, कार्याध्यक्ष रूपेश भोसले, सुशांत मलमे, उपसरपंच विपुल भिलवडे, गब्रू गावडे, भरत माणगावे, सौरभ भिसे, बबन माने, बबलू दळवी उपस्थित होते. कुस्तीचे समालोचन नंदू सुतार, मायकल चिपरीकर, भरत पाटील यांनी केले. कुस्ती कमिटी अध्यक्ष सावकर दळवी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com