कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा विद्यापीठ प्रशासनाला टेन्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा विद्यापीठ प्रशासनाला टेन्शन
कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा विद्यापीठ प्रशासनाला टेन्शन

कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा विद्यापीठ प्रशासनाला टेन्शन

sakal_logo
By

89491
.....

विद्यापीठ प्रशासनाला पुन्हा टेन्शन

‘जुनी पेन्शन’च्या लढ्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग; सोमवारपासून बेमुदत कामबंद

कोल्हापूर, ता. १६ ः जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यात आता शिवाजी विद्यापीठ सेवक संघ आज सहभागी झाला. या संघाचे पदाधिकारी, सभासदांनी सोमवार (ता. २०) पासून कामबंद करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनामुळे विद्यापीठ प्रशासनाचे टेन्शन वाढणार आहे.
सेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी २ ते २ वाजून ३० मिनिटे यावेळेत द्वारसभा घेतली. त्यामध्ये सभासदांनी निदर्शने केली. ‘जुनी पेन्शन’ योजना लागू करण्याबाबतच्या घोषणा दिल्या. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार सेवक संघाने या ‘जुनी पेन्शन’च्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आज निर्दशने केली. उद्या, शुक्रवारी आणि शनिवारी (ता. १८) दुपारी दोन वाजता कर्मचारी काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज करणार आहेत. सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले जाईल. त्यामध्ये संघाचे सर्व ३८५ सभासद सहभागी होतील, असे सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले. यावेळी संजय पोवार, राम तुपे, निशिकांत पलंगे, चंद्रशेखर कदम, विकास मोहिते आदी उपस्थित होते.