`सारथी`तर्फे `सीएसएमएस` पदविका अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

`सारथी`तर्फे `सीएसएमएस` पदविका अभ्यासक्रम
`सारथी`तर्फे `सीएसएमएस` पदविका अभ्यासक्रम

`सारथी`तर्फे `सीएसएमएस` पदविका अभ्यासक्रम

sakal_logo
By

‘सारथी’तर्फे ‘सीएसएमएस’ पदविका अभ्यासक्रम
सहा महिन्यांचा कालावधी; मराठा, कुणबी तरुणांसाठी लाभ
इचलकरंजी, ता. १६ ः सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट प्रोग्रॅम अंतर्गत `सीएसएमएस` या रोजगारभिमुख पदविका उपक्रमास प्रारंभ झाला आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी या प्रवर्गातील तरुणांना या अभ्यासक्रमाचा लाभ होणार आहे. तरुणांची रोजगार क्षमता व स्वयंरोजगार क्षमता वाढवणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरुन काढणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. अभ्यासक्रमात प्रत्येकी १२० तासांचे चार मॉड्यूल असतील. कार्यक्रम कालावधी ४८० तासांचा असून सहा महिन्यांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. नोंदणीच्या तारखेस उमेदवाराचे वय १८ ते ४५ असणे बंधनकारक आहे. उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा. आई -वडील, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र आठ लाखापेक्षा कमी असावे, महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असून सारथीने नमूद केलेली वैध कागदोपत्री पुरावे सादर करावी लागणार आहेत. माहितीसाठी श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, पीएनजी ज्वेलर्सजवळ, लांडे हॉस्पीटलसमोर, इचलकरंजी येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.