मुद्रांकची वसुली उद्दीष्टापेक्षा जास्तच

मुद्रांकची वसुली उद्दीष्टापेक्षा जास्तच

विशेष
निवास चौगले

मुद्रांकची वसुली
उद्दिष्टापेक्षा जास्तच;
राज्याच्या महसुलात दुसऱ्या क्रमांकावर
-------------
राज्याच्या तिजोरीत दुसऱ्या क्रमांकाचा महसूल जमा करणाऱ्या जिल्ह्यातील मुद्रांक विभागाने गेल्या पाच वर्षांत उद्दिष्टांपेक्षा जास्तच रक्कम जमा केली आहे. यावरून जिल्ह्यात खरेदी-विक्रीच्या व्यवहाराबरोबरच इतर नोंदणीकृत्त व्यवहारांची संख्याही वाढल्याचे स्पष्ट होते.
------------
कोल्हापूर जिल्ह्यात मुद्रांक विभागाची १८ कार्यालये आहेत. यापैकी कोल्हापूर शहरात चार तर इचलकरंजी व गडहिंग्लज शहरात प्रत्येकी एक आहेत. उर्वरित १२ कार्यालये तालुक्याच्या ठिकाणी आहेत. या कार्यालयांमार्फत खरेदी, विक्रीसह बक्षीस पत्र, बँकेचे तारण गहाण व अन्य व्यवहार कायदेशीर पद्धतीने नोंदणी केले जातात. खरेदी, विक्रीवर पाच टक्के मुद्रांक शुल्क व एक टक्का जीएसटी असे सहा टक्के शुल्क आकारले जाते.
अलिकडेच जिल्‍ह्यातीलच नव्हे तर राज्यातील मुद्रांक वसुली कार्यालये संगणकांशी जोडली आहेत. जिल्ह्यात या सुविधेचे विक्रेंद्रीकरण मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आहे. त्यावर दर अर्ध्या तासाला किती दस्त झाले, ते कोणत्या प्रकारचे होते व त्यातून किती महसूल जमा झाला हे तत्काळ समजते. दरवर्षी मुद्रांक महासंचालक कार्यालयाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी मुद्रांक वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या पाच वर्षांत जेवढे उद्दिष्ट ठरवून दिले होते, त्यापेक्षा दरवर्षी जास्त महसूल जमा झाला आहे.
--------------------
दृष्‍टिक्षेपात जिल्ह्यातील मुद्रांक वसुली (कोटीत)
वर्ष*दिलेला उद्दिष्ट*पूर्ण झालेला उद्दिष्ट*टक्केवारी
२०१७-१८*२६५*२८४.१७*१०७.४३
२०१८-१९*२९४*३००.३५*१०२.१५
२०१९-२०*२८९*२९२.९७*१०१.३५
२०२०-२१*२६०*२९३.६१*११२.९२
२०२१-२२*३२९*३५६.५४*१०८.३७
२०२२-२३*३५०*३४८.९१*९९.६८
(जानेवारी २३ पर्यंत)
------------------
ग्राफ
वाढता महसूल.. (कोटीत)
२०१७-१८-२८४.१७
२०१९-२०-२९२.९७
२०२२-२३-३४८.९१ (जानेवारी २३ पर्यंत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com