सरोजिनी महिला सेवा मंडळातर्फे विविध उपक्रम

सरोजिनी महिला सेवा मंडळातर्फे विविध उपक्रम

KOP23L89520
इचलकरंजी ः सरोजिनी महिला सेवा मंडळातर्फे विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव करण्यात आला.
..........

सरोजिनी महिला सेवा मंडळातर्फे विविध उपक्रम

इचलकरंजी, ता. १६ ः येथील सरोजिनी महिला सेवा मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रम झाले. पाककला स्पर्धा, विविध प्रकारचे सरबत बनविण्याचे प्रशिक्षण व यशस्वी उद्योजिका पुरस्कार वितरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या ॲड. दिलशाद मुजावर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी वैशाली वरुटे, पूजा टाकवडे, शीतल जाधव, अर्चना हजारे यांना यशस्वी उद्योजिका पुरस्कार देण्यात आला. पाककला स्पर्धा स्नेहा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांक-शुभांगी कोरे व निशा कांबळे, द्वितीय क्रमांक - प्रीतिका कबाडे व नयन डेक्कनावर, तृतीय क्रमांक - रसिका नवनाळे व गंगूबाई रुग्गे यांना मिळाला. त्यांच्यासह सहभागी सर्व स्पर्धकांना पारितोषिक व भेटवस्तू देण्यात आल्या. विविध प्रकारचे सरबत बनविण्याचे प्रशिक्षण सरिता पांडव यांनी दिले. मंडळाच्या अध्यक्षा वर्षा राहुल खंजिरे यांनी यापुढेही महिलांसाठी विविध उपक्रम घेण्यात येतील, असे सांगितले. एस. एस. बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com