वडणगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडणगे
वडणगे

वडणगे

sakal_logo
By

89526
वडणगे- निगवे दुमाला ः येथील ज्योतिर्लिंग हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करताना मान्यवर.

ज्योतिर्लिंग हायस्कुलमध्ये गणवेश वाटप
वडणगे ः ः वडणगे- निगवे दुमाला (ता.करवीर) येथील ज्योतिर्लिंग हायस्कुलमध्ये होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप व वार्षिक पारितोषिक वितरण झाले. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे संघटक सचिव मदन पाटील यांच्या हस्ते ३० विद्यार्थ्यांने गणवेशाचे वाटप करणयात आले. तसेच वर्षभर होणाऱ्या विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात मदन पाटील यांनी विद्यार्थ्यांनी येणाऱ्या आव्हानाला तोंड देऊन विकास साध्य करावा. डोळ्यापुढे नेहमी आपले ध्येय ठेवून वाटचाल करावी. परिस्थितीचा बाऊ न करता सतत कष्ट करावे अशा भावना व्यक्त केल्या. मुख्याध्यापक मदन पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुन्वर मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले.