१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

जिल्ह्यात विकासकामांसाठी
मंत्री भुमरेंकडून दोन कोटी
बाजारभोगाव ः रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांच्या फंडातून जिल्ह्यातील वीस गावांतील विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती कुंदन पाटील यांनी दिली. काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉकसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून बाजारभोगाव, वारनूळ, साळवाडी, काळजवडे, किसरूळ, कुंभारवाडी, काटेभोगाव, देसाईवाडी, उंड्री, आंबवडे, पिसात्री, म्हाळुंगे तर्फ बोरगाव, वेतवडे, मरळी, पुशिरे, पुनाळ, आंबवडे (ता. पन्हाळा), भामटे व चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर), मांडुकली (ता. गगनबावडा) या गावांसाठी प्रत्येकी दहा लाखांचा निधी मंजूर झाला. लवकरच कामांना सुरूवात होईल, असे कुंदन पाटील यांनी सांगितले.