Sun, May 28, 2023

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त
Published on : 16 March 2023, 6:55 am
पारेवाडी फाट्यावर टँकरचालकाचा मृत्यू
आजरा, ता. १६ ः परशुराम वसंत शिंदे (वय ३५, रा. कुपवाड जि. सांगली) यांचे हदयविकाराने निधन झाले. आजरा-आंबोली मार्गावर पारेवाडी (ता. आजरा) तिठ्यावर ते आज दुपारी अत्यवस्थ अवस्थेत मिळून आले होते. स्थानिक लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आजरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. वैद्यकीय अधिकारी वैभव लोंढे यांनी आजरा पोलिसात वर्दी दिली. आजरा पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.