टिपरचालकांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिपरचालकांचे आंदोलन
टिपरचालकांचे आंदोलन

टिपरचालकांचे आंदोलन

sakal_logo
By

89568

टिपरचालकांच्या किमान वेतनासाठी ‘आप’चा घंटानाद
कोल्हापूर, ता. १६ ः महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या टिपरचालकांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन केले. शंभराहून अधिक चालक सहभागी होते.
तुटपुंज्या वेतनावर चार वर्षे चालक काम करत आहेत. कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जाते का हे तपासून ठेकेदारांची बिले काढण्याचे अपेक्षित आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जुने टेंडर बदलून नवीन टेंडरमध्ये किमान वेतनाच्या अटी समाविष्ट कराव्यात, किमान वेतन दिले जाते का नाही हे तपासूनच ठेकेदारांची बिले काढावीत या मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाचा पहिला दिवस असून, उद्या ठिय्या मांडला जाणार आहे. रविवारपर्यंत निर्णय न झाल्यास सोमवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ''आप''चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, उत्तम पाटील, संजय साळोखे, दुष्यंत माने, विजय हेगडे, अमरजा पाटील, पूजा आडदांडे, डॉ. उषा पाटील, उषा वडर, संजय राऊत, कुमार साठे, युवराज कवाळे, रणजित बुचडे, करण चौधरी, जयसिंग चौगुले, अमरसिंह दळवी आदी उपस्थित होते.