शेतकरी संघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी संघ
शेतकरी संघ

शेतकरी संघ

sakal_logo
By

सकाळ इम्पॅक्ट
...

मार्चअखेर भूखंड रिकामा करा

साहित्य जप्त होणार : शेतकरी संघाची भूमिका

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : शेतकरी सहकारी संघाच्या टिंबर मार्केट येथील भूखंडावर विळखा घालून बसलेल्या ‘पोट कुळांनी’ मार्चअखेर जागा रिकामी करावी. जागा रिकामी न केल्यास तेथील साहित्य जप्त केले जाईल, असा इशारा शेतकरी सहकारी संघाने आज दिला आहे. चार ते पाच -सहा महिन्यांपासून कब्बा केलेल्या या पोटकुळांना हाकलून लावून संघाचा भूखंड रिकामा करण्याची भूमिकाही संघाने घेतली आहे. ‘सकाळ’ मधून आज (ता. १६) प्रसिध्द झालेल्या ‘शेतकरी संघ भूखंडावर पोटकुळांचा कब्जा’ या वृत्ताची दखल घेत प्रशासकीय मंडळाने तीव्र भूमिका घेतली आहे.
संघाच्या मालमत्तेमधून उत्पन्न मिळावे, यासाठी टिंबर मार्केट येथील जमीन एका माजी कर्मचाऱ्याला भाड्याने दिली होती. संघासोबत झालेल्या करारानुसार महिन्याला द्यावे लगाणारे भाडे परवडत नसल्याने सुमारे एक एकर असणार भूखंडाचा करार ३१ ऑक्टोबर २०२२ ला रद्द केला. या भाडेकरुने आपल्या मर्जीतील काही लोकांना पोटकूळ म्हणून ठेवले होते. हे पोटकुळ तेथून हलण्यास तयार नव्हते. प्रशासक अमर शिंदे असताना त्यांनी हा करार रद्द केला होता. पोटकुळांनी बसवलेले आपले बस्तान कायम ठेवले. यावर संघाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. डिसेंबर २०२२ मध्ये प्रशासकीय मंडळाचा कारभार सुरु झाला. प्रशासकांनी पोटकुळांनी जागा सोडण्याबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या. तरीही ते जागा सोडण्यास तयार नव्हते. आजही ते याच जागेवर कायम आहेत. त्यामुळे संचालकांनी या पोटकुळांना ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत त्यांनी आपले साहित्य इतरत्र हलवले पाहिजे. मार्चनंतर कोणतीही सूचना न देता येथील असणारे सर्व साहित्य जप्त केले जाणार आहे. याबद्दल शेतकरी संघाच्या प्रशासकीय मंडळाने सूचना दिल्या आहेत.
...

‘प्रशासक असताना हा करार रद्द झाला होता. त्यानंतर प्रशासक म्हणून या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी सूचना दिल्या आहेत, तसेच प्रत्यक्ष भेटूनही बोलणे झाले आहे. ३१ मार्चपर्यंत त्यांना सर्व साहित्य काढून घेण्याच्या सूचना आज दिल्या आहेत. साहित्य काढले नाही तर ते सर्व साहित्य जप्त केले जाईल. त्यानंतर कोणतीही सबब चालणार नाही.

सुरेश देसाई, प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष