शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २९ मार्चला होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २९ मार्चला होणार
शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २९ मार्चला होणार

शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २९ मार्चला होणार

sakal_logo
By

विद्यापीठ लोगो
...
फोटो (राज्यपाल रमेश बैस यांचे संग्रहित छायाचित्र वापरावे)
............
............

शिवाजी विद्यापीठाचा
दीक्षान्त समारंभ २९ मार्चला

राज्यपाल रमेश बैस अध्यक्षस्थानी; कुलपती कार्यालयाकडून पत्र

कोल्हापूर, ता. १६ ः शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षान्त समारंभ २९ मार्च रोजी होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस असणार आहेत. त्याबाबतचे पत्र कुलपती कार्यालयाकडून आज विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाले.
विद्यापीठाने १६ फेबुवारी रोजी दीक्षान्त समारंभ घेण्याचे निश्‍चित केले होते. त्यासाठी इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे प्रमुख पाहुणे म्हणून ठरले. ६६ हजार ४५७ पदवी प्रमाणपत्रांची छपाई पूर्ण झाली; पण तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यासह विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने काही अपरिहार्य कारणास्तव दीक्षान्त समारंभ स्थगित करण्याचा निर्णय १३ फेब्रुवारी रोजी जाहीर केला. नवे राज्यपाल रमेश बैस यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर या समारंभाचे आयोजन आणि त्यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठ प्रशासनाने कुलपती कार्यालयाला पत्र पाठविले. त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत विद्यापीठ प्रशासन होते. प्रशासनाची प्रतीक्षा आज संपली. कुलपती कार्यालयाकडून प्राप्त पत्रात दीक्षान्त समारंभासाठी २९ मार्च ही तारीख निश्‍चित केली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाची या समारंभासाठी नव्या निमंत्रण पत्रिकांची छपाई करणे, कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे आदी स्वरूपातील तयारी सुरू होणार आहे.