
नागराज मंजूळे
‘घर बंदूक बिर्याणी’ पूर्वग्रह न
ठेवता प्रेक्षकांनी पाहावा ः मंजूळे
कोल्हापूर, ता. १५ ः घर बंदूक बिर्याणी हा बिग बजेट चित्रपट नाही तर कल्पकतापणाला लावून चित्रपटाची गोष्ठ बनवली आहे. या चित्रपटात मी कोल्हापूरी पध्दतीची भूमिका साकारली आहे. कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा, एवढीच आमची निखळ अपेक्षा आहे, असे मत चित्रपट निर्माते दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
चित्रपट लवकरच प्रदर्शीत होत आहे. त्यानिमित्त मंजूळे व कलाकार येथे आले होते.
ते म्हणाले की, ‘‘ आपण आपले काम करावे असा माझा प्रयत्न होता. जागतिक पातळीवर, देश पातळीवर जे चांगले ते झळकावे असा माझा प्रयत्न असतो. तशा प्रकारे याचित्रपटाचे कथानक तयार केले तसेच निर्मितीसाठी ही नवीन प्रयोग केले. या चित्रपटात मी ॲक्शन भूमिका केली आहे. धमाल केली आहे. ॲक्शऩसाठी पी. गणेशन नावाचे दाक्षिणात्य फायईट मास्टर चित्रपटासाठी वापरले. ५० दिवस गगनबावड्यात चित्रीकरण केले आहे. तो प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.’’
अभिनेता आकाश ठोसर म्हणाला, ‘ या चित्रपटात काम करण्याचा खुप वेगळा अनुभव आला. बिर्याणी सारखे मसालेदार मिश्रण चित्रपटात आहे. पहिल्यांदाच नागराज मंजूळे यांच्यासोबत या चित्रपटात पडद्यावर अभिनय केला आहे.’’
अभिनेत्री सायली पाटील म्हणाले, ‘चित्रपटाला अनेक अंग आहेत. याचित्रपटात लक्ष्मी नावाची भूमिका केली आहे. माझी वेगळी भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल.’’