महावीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावीर
महावीर

महावीर

sakal_logo
By

89604
कोल्हापूर ः महावीर महाविद्यालयात बोलताना जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई. शेजारी मेघा पाटील, प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे, डॉ. शैलजा मंडले.

मुलींनी सजग राहिले
पाहिजेः जयश्री देसाई

निर्भया पथकातर्फे प्रबोधनपर व्याख्यान
कोल्हापूर, ता. १६ ः महावीर महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीमार्फत ‘निर्भया पथकाचे कार्य व भूमिका’ या विषयावर शहर पोलिस निर्भया पथकामार्फत प्रबोधनपर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे होते.
जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई म्‍हणाल्या, ‘महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून, मुलींनी सजग राहिले पाहिजे. आपल्या आईवडीलांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे, तसेच अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडल्यास आयुष्यावर विपरित परिणाम होतो. यासाठी असणारे विविध कायदे व त्याविषयी असणाऱ्या शिक्षेविषयी माहिती घेतली पाहिजे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वेळेचा अपव्यय न करता आवडणाऱ्या करिअरकडे एकाग्रतेने ध्येय गाठावे.’शहर पोलिस निर्भया पथकाच्या प्रमुख मेघा प्रकाश पाटील यांनी शहरामधील निर्भया पथक कशाप्रकारे काम करते याबाबत माहिती दिली. तसेच ११२ किंवा १०० नंबर वर दूरध्वनी केल्यास त्वरीत पोलिसांची मदत मिळू शकते असे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. अश्विनी कोटणीस यांनी केले. परिचय शशिकला सरगर यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. स्वाती शिंदे यांनी केले. आभार डॉ.महादेव शिंदे यांनी मानले. अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुख डॉ. शैलजा मंडले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.