शाहूवाडी

शाहूवाडी

मयत संतोष पळसकर
01979


ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार

दोघे जखमी ः शिरगाव येथे अपघात

शाहूवाडी, ता. १६ ः शिरगाव (ता. शाहूवाडी) येथे ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत संतोष साधू पळसकर (वय ३६, रा. लाळेवाडी, ता. शाहूवाडी) जागीच ठार झाला, तर त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास अपघात घडला. याबाबतची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी ः संतोष पळसकर व त्याचे दोन मित्र मोटारसायकल (एम.एच.०७ के ३४७२) वरून सकाळी शिवारे येथील बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून घरी परतताना शिरगाव येथील बालदास मठाजवळ त्यांच्या मोटारसायकलला समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीची धडक बसली. त्यात मोटारसायकलचालक संतोषच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मलकापूर ग्रामीण रुगणालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मोटारसायकलवरील एन्य एकाचा (रा. येळाणे) पाय मोडला असून, तो गंभीर जखमी झाला. दुसरा मित्रही (रा. मलकापूर) गंभीर जखमी झाला. दोघांवरही मलकापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला सीपीआरमध्ये पाठविले. ट्रॅक्टरचालक विजय आबास व्हावळे (रा. वडगाव) याने भरधाव व निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालविल्याने अपघात झाल्याचा गुन्हा पोलिसांत नोंद झाला आहे. ट्रॅक्टर व ट्रॉलीवर नंबर प्लेटही लावलेल्या नाहीत. मृत संतोष शेतकरी असून, त्याच्या मागे मुलगा, दोन मुली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com